अहमदनगर

राहुरीमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी

अमृता चौगुले

राहुरीः पुढारी वृत्तसेवा : शहरातील कुसळकर हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची चेन व पोत हिसकावून घेतली, तसेच शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. याबात शाहीन फारूक शेख (वय 52, रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी) या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 27 जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजेदरम्यान शाहीन शेख या राहुरी शहरातील कुसळकर हॉस्पिटलसमोर उभ्या होत्या.

त्यांची मुलगी अमरीन अहमदहुसेन इनामदार हिला न्यायालयातून तीन हजार रुपये पोटगी देण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी तेथे आले व म्हणाले की, तुमच्यामुळे आम्हाला पोटगी बसली आहे. तुम्हाला भीक लागली आहे का? असे म्हणून आरोपींनी शाहीन शेख यांना शिवीगाळ करुरून त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन व पोत हिसकावून घेतली. तेव्हा शाहीन शेख यांचे पती त्यांना म्हणाले की, आपली कोर्टात केस चालू आहे. तेव्हा त्यांना देखील शिवीगाळ केली. तसेच तूम्ही केस मागे घेतली नाहीतर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली.

शाहीन फारूक शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी अहमदहुसेन रियाजअहमद इनामदार, मोहम्मदहुसेन रियाजअहमद इनामदार, शहेनाज रियाजअहमद इनामदार (रा. पुणे, तसेच इरफान अल्लाबक्ष शेख, (राहणार सोलापूर) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.

SCROLL FOR NEXT