अहमदनगर

रक्तचंदनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस कोठडी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा:  एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावणे चार कोटी रुपयांच्या रक्तचंदन साठा जप्त केल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबई येथून तीन जणांना अटक केली. त्यांना गुरूवारी (दि. 8) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली.

विठ्ठल बबन झावरे (रा. वासुंदे, ता. पारनेर), संतोष साहेबराव माने (रा. सावरगाव, ता. पारनेर), सागर गोविंद मुळे (रा. जांबूत, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी जागा मालक सदाशिव झावरे याला अटक केलेली असून, गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.

दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लक्ष्मण गणपत शिर्के हा अद्यापही पसार आहे. एमआयडीसी परिसरात एका गोदामात साठवलेले साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गाळा मालक सदाशिव झावरे याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबई येथील लॉजवरून आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. आज त्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT