अहमदनगर

येसवडी तलाव कुकडीच्या पाण्याने ओव्हरफ्लो

अमृता चौगुले

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील येसवडी येथील तलाव गेल्या चार वर्षांपासून कोरडाठाक होता. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेवरून व मार्गदर्शनाने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांच्या हस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले. यामुळे येसवडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उन्हाळ्यात या पाण्याचा परिसरातील सर्व शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. येसवडीच्या सरपंच जयश्री त्र्यंबक पिसे, उपसरपंच कृष्णा मरळ व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार राम शिंदे यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांना सांगितले की, जलपूजन तुम्हीच करा. म्हणजे येसवडी तलाव तुमच्या लक्षात राहील. या ठिकाणी नेहमी कुकडीचे आवर्तन सोडा. येसवडीकरांचे 25 वर्षांचे स्वप्न या वर्षी पूर्ण झाले आहे. कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने येसवडी तलाव पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच भरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाण्याची अडचण येणार नाही.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, दत्ता गोसावी, सुनील काळे, सोएब काझी, बंडाभाऊ मोढळे, तात्यासाहेब माने, योगेश शर्मा, अंकुश राऊत, कृष्णा मरळ, जयदीप पिसे, सुभाष सामसे, तुषार पिसे, मंगेश साळवे, उमेश भैलुमे, दगडू कांबळे, संदीप कांबळे, हिरामण उकिरडे, विलास काळे, रवींद्र दंडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांना वाटले आता मी पुन्हा येणार नाही. मात्र मी अडीच वर्षांतच पुन्हा आलो! मी नसल्याने गेली अडीच वर्षे कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले नाही. आता मी आलो आणि पाणीही आले. अडीच वर्षांचा पाण्याचा अनुशेष भरून काढणार.
                                                    – प्रा. राम शिंदे आमदार, विधान परिषद

SCROLL FOR NEXT