पारनेर : पुढारी वृत्तसेवा : मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीशी जोडला जाणार आहे. यासाठी नमुना 6 'ब' फॉर्म तयार करण्यात आला असून, मतदारांचे नाव मतदार यादीतील नोंदेशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत. ऑगस्टपासून पारनेर तालुक्यात व मतदारसंघात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.
यासाठी बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन मतदाराचा आधार क्रमांक फॉर्म नंबर 6 'ब'द्वारे जमा करण्यात येणार आहे. मतदारांना फॉर्मच्या प्रती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच मतदारांना ऑनलाईन आधार क्रमांक भरण्यासाठी 6 'ब' व वेबसाईटच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे. ऑगस्टपासून मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी केले.
निवडणूक विभागात काम करणार्या प्रशासनाचा ताण कमी होईल, मतदार यादी शुद्ध होऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे काम हलके होणार आहे
-सुधाकर भोसले, प्रांताधिकारी, पारनेर