अहमदनगर

भोकर : पंधरा एकर सोयाबीन क्षेत्र पाण्यात

अमृता चौगुले

भोकर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात दमदार पावसाने एकीकडे परीसरातील बळीराजा सुखावला असला, तरी दुसरीकडे मात्र आडमुठेपणामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
खोकरफाटा ते खानापूर रोडलगत सिडीवर्कचा पूल न बांधल्याने 10 एकर सोयाबीन पाण्यात आहे, तर भोकर-अडबंगनाथ रोडवरही पावसाळ्यात पाण्याचा स्त्रोत असतानाही साईड गटार बांधल्या.

परंतू पूल बांधून सिमेंट नळ्या न टाकल्याने तेथेही 5 एकर सोयाबीन पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले. आता हे संतप्त शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. भोकर शिवारात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत, परंतू ठेकेदार लगतच्या शेतकर्‍यांची अडचण समजून न घेता शेतकर्‍यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरताना दिसत असल्याचे संतप्त शेतकरी सांगतात.

SCROLL FOR NEXT