अहमदनगर

पाथर्डी : तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला

अमृता चौगुले

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील मिरी येथील प्रमोद तुकाराम केरकर (वय 21) यांच्यावर गावातीलच पांडुरंग निमसे याने शनिवारी तलवारीने जीवघेणा हल्ला केला. पाथर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला.
प्रमोद तुकाराम केरकळ यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, पांडूरंग केरकळ याचा मुलगा महेश पांडुरंग निमसे याच्या सोबत 27 सप्टेंबर रोजी सुपा (ता. पारनेर) येथे आला. महेश याने त्याच्या पिकअप वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे रस्त्याच्या कडेला लावला.

त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आदिवासी समाजातील मुले आली व मला थांबण्यास सांगून ते कोठे तरी गेले. मला संशय आल्याने मी मिरी येथे आलो. नंतर मला समजले की महेश निमसे यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता मिरी गावातील खानची वेस येथे मी मित्रासोबत शेकत बसलो असताना महेश निमसे याचे वडील पांडुरंग निमसे तलवार घेऊन आले व मला म्हणाले की, माझ्या मुलाला चोर कोण म्हणाले, त्यावर मी मला माहित नसल्याचे सांगितले.

त्यावेळी पांडुरंग निमसे तलवार घेऊन माझ्यावर धावला. तो तलवार माझ्या डोक्यात घालणार, तोच मी डाव्या हाताने तलवार धरण्याचा प्रयत्न करीत असताना तलवारीने माझ्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. त्यामुळे मनगटावर गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने मला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रमोद केरकळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT