अहमदनगर

पाडळी रांजणगाव सोसायटीत पुन्हा सत्ताधाऱ्याचांच गुलाल

अमृता चौगुले

वाडेगव्हाण : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने दणदणीत विजय संपादन केले. संस्थेच्या निवडणुकीत माजी पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरल्याने काटे की टक्कर पहायला मिळाली.

सत्ताधार्‍यांच्या बाजूने सरपंच विक्रम कळमकर आणि डी. बी. करंजुले यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच अप्पासाहेब साठे यांच्यासह बारा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत संस्थेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. विरोधी गटाच्या बाजूने माजी पं. स. सदस्य गुलाब करंजुले, माजी सरपंच मारुती उबाळे, सुरेश उबाळे आणि भाऊसाहेब करंजुले यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच कैलास करंजुले, माजी सरपंच अरुण कळमकर, माजी सरपंच सुरेश साठे आणि माजी उपसरपंच विनायक उबाळे आदी ग्रामपंचायतच्या माजी पदाधिकार्‍यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

साधना करंजुले या एकमेव महिला उमेदवाराने अवघ्या दोन मतांनी निसटता विजय मिळवत विरोधकांची लाज राखली. अप्पासाहेब कळमकर, संभाजी करंजुले, गणेश कळमकर, अप्पासाहेब साठे, कांतीलाल उबाळे, सुदाम साठे, गणेश करंजुले, एकनाथ साठे, वामन जाधव, नंदा कळमकर, साधना करंजुले, देवराम करंजुले आणि भगवान उघडे आदींची संचालकपदी निवड झाली. दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

नवनिर्वाचितांची सवाद्य मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्ष आशा करंजुले, माजी अध्यक्ष दादाभाऊ घावटे, साहेबराव कळमकर, विठ्ठल साठे, भाऊसाहेब उबाळे, अरुण उबाळे, सीताराम साठे, खंडू खेसे, दीपक जाधव, रमेश औटी आदींसह सभासद उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT