अहमदनगर

नेवासा : तालुक्यातील मातब्बर नेत्यांचा हिरमोड!

अमृता चौगुले

नेवासा, कैलास शिंदे : जिल्हा परिषद पंचायत निवडणुक आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याने महिला राज राहणार आहे. मातब्बरांचा आरक्षण सोडतीमध्ये हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य होण्याऐवजी नेवासा तालुक्यात पंचायत समिती सदस्य होण्यासाठीच अनेकांचा मनसुबा असण्याची शक्यता आहे.

गुरूवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहिर झाले. जिल्हा परिषदेचे आरक्षण नगरमध्ये तर पंचायत समितीचे आरक्षण सोडत नेवासा तहसील कार्यालयात झाली.

यामध्ये आरक्षण संदर्भात जाहीरपणे पन्नास टक्के महिला आरक्षण म्हणून आतापर्यंत जे काही बाजू महिला वर्गांसाठी सरकारने राखीव ठेवलेली आहे त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यामध्ये पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त महिलांचे आरक्षण गट व गण झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेवासा तालुक्यात 7 ऐवजी 8 गट झालेले आहेत. गण 16 झालेले आहेत. जिल्हा परिषद गटात आठ पैकी सात महिला तर पंचायत समितीत सोळा पैकी आठ महिला राहणार आहेत.

अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनील गडाख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरता येणार नाही. लंघे यांच्या कन्या तेजश्री लंघे या गेल्या वेळी कुकाणा गटातून निवडून आल्या होत्या. यावेळी गट पुर्नरचनेते कुकाणा गटच संपुष्टात आला आहे. त्या ऐवजी सलाबतपूर गट झालेला आहे. सलाबतपूर गटाला नव्याने खामगाव गण जोडलेला आहे.

आता विठ्ठलराव लंघेंच्या पत्नी रत्नमाला किंवा कन्या तेजश्री या सलाबतपूर सर्वसाधारण महिलेसाठी असलेल्या गटातूनच लढण्याची चिन्हे आहेत. लंघेंचे शिरसगाव असलेले गावच या गटात नसले तरी, सलाबतपूर गटात लंघेंना मानणारा मोठा वर्ग आहे. या भागात आरक्षणा अगोदरच तयारी केल्याचे दिसत होते. याठिकाणी चुरशीची लढत दिसणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या पत्नी उषा गडाख या आता ओबीसीसाठी राखीव सोनई किंवा सर्वसाधारण महिलेसाठी असलेल्या नवीन शिंगणापुर गटातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. पंचायत समितीचे चांदा, खामगाव, सलाबतपूर, कुकाणा हे गण सर्व साधारणसाठी असल्याने व जिल्हा परिषद गटांत महिलांसाठी अधिक आरक्षण असल्याने अनेक जण पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक रस दाखविण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद गट आरक्षण

सोनई – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शनिशिंगणापूर – सर्वसाधारण महिला, चांदा – अनुसूचित जाती महिला, पाचेगाव – अनुसूचित जमाती, भानसहिवरे – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, भेंडा बु – सर्वसाधारण महिला, सलाबतपूर – सर्वसाधारण महिला, बेलपिंपळगाव – अनुसूचित जमाती महिला.

पंचायत समिती गण आरक्षण

  • सोनई – सर्वसाधारण महिला
  • घोडेगाव – अनुसूचित जाती
  • शनिशिंगणापूर – सर्वसाधारण महिला
  • खरवंडी – सर्वसाधारण महिला
  • करजगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • चांदा – सर्वसाधारण
  • देडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • बेलपिंपळगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • प्रवरासंगम – अनुसूचित जाती महिला
  • खामगाव – सर्वसाधारण
  • सलाबतपूर – सर्वसाधारण
  • कुकाणा – सर्वसाधारण
  • भेंडा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • मुकिंदपुर – सर्वसाधारण महिला
  • भानसहिवरे – सर्वसाधारण महिला
  • पाचेगाव – अनुसूचित जाती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT