अहमदनगर

नुपूर शर्माच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद, गुन्हे दाखल करण्याची होते आहे मागणी

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा: भाजपच्या नुपुर शर्मा व नवीन जिंद्दल प्रवक्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जामखेड येथील मुस्लीम समाजाच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देत केली. यावेळेस मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, सकाळपासून जामखेड मध्ये व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला.

निवेदनात म्हटले की, भाजपचे नुपुर शर्मा व नविन जिंद्दल या दोन्ही प्रवक्त्यांनी एका टीव्ही डिबेटच्या दरम्यान जाणीवपूर्वक पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा जामखेड येथील मुस्लीम बांधवांनी निषेध व्यक्त करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शुक्रवारी जामखेड शहरातील मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान, मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदाला व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

SCROLL FOR NEXT