अहमदनगर

नाऊर : विजेच्या तारेत अडकली बस; वाहकाला शॉक

अमृता चौगुले

नाऊर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर आगारातून सुटणारी बस नाऊर – रामपूर चौफुलीच्या पुढे जाताच, रामपूर रस्त्यावर शेतीपंपाची विद्युत वाहिनी असलेल्या विद्युत तारा बसला अटकल्या. मात्र, चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्वरित गाडी थांबून पाहिले असता, विद्युत तारांचे घर्षण होऊन जाळ निघाला.

मागे बसलेल्या वाहकाला ही कल्पना दिली असता, वाहक खाली उतरत असताना त्यांना दरवाजात शॉक बसला. सुदैवाने या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी नव्हत्या. बसमध्ये अवघा एक प्रवासी वगळता कोणी नव्हते.

SCROLL FOR NEXT