नगर, पुढारी वृत्तसेवा : बिहार सरकारच्या किलकारी बाल भवन विभागाने आयोजित प्रथम सिनेलर्नर आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवात मांज्या या लघुपटाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. मांज्या या लघुपटाला आतापर्यंत एकूण 34 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी आंतराष्ट्रीय स्तरावरील चार पुरस्कार मिळाले आहेत.
या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पांडुरंग भांडवलकर यांनी केले आहे. निर्मिती न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागाने केली आहे. छायांकन जगदीश आंबेडकर आणि प्रवीण खाडे यांनी केले आहे. संकलन ऐश्वर्या कटके यांनी केले आहे. प्रथम सिनेलर्नर आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवात मांज्या या लघुपटाला सिनियर कॅटेगरीतील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
लघुपट महोत्सवात एकूण दीड हजार लघुपट प्राप्त झाले होते. त्यातून वीस लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. कार्यक्रमासाठी अभिनेत्री संजना कपूर आणि बिहार सांस्कृतिक विभागाच्या वंदना प्रेयाशी उपस्थित होत्या.