नगर, सूर्यकांत वरकड : गणेशोत्सव आनंद, उत्साह आणि भक्तीरसाचा सण. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. नगर शहरात मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरमध्ये बनविलेल्या मूर्तींना पुणे, मुंंबई, पराज्यासह पदेशात मागणी आहे. परंतु, मोठ्या मूर्ती बनविण्यास उशिरा परवानगी मिळाल्याने यंदा प्रथमच मोठ्या मूर्तीचा तुटवडा जाणवणार असल्याचे सांगण्यात येते.
अबालवृद्धांसह सर्वांना हवाहवासा वाटणार आणि प्रत्येकांच्या घरा आनंद हर्ष उल्हासाचे आगमन करणारा गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळाचे गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी मंडप उभारणीसाठी परवागनी घेऊन मंडप उभारणे सुरू केले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यावरही मंडळाचा भर आहेे. गणेश कारखान्यावरमध्ये गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहवयास मिळत आहे.
शासनाने कोविड कालावधीत गणेश मूर्तीसंदर्भात घातलेल्या अटी सरकारने आता शिथिल केल्या आहेत. त्यास उशीर झाल्याने मूर्तीकारांना मोठ्या मूर्ती बनविणे शक्य झालेले नाही. कारखान्यांमध्ये साधारण 250 ते 11 हजार रुपयांपर्यंत मूर्ती विक्रीस आहेत. अनेक कारखान्यामधून व्यापार्यांमार्फत मूर्ती परदेशात जात आहेत. आतापर्यंत अनेक व्यापार्यांनी नगरमधील कारखान्यामधून मूर्ती खरेदी करून परदेशात, पुणे, मुंंबई, गुजरात, हैद्राबाद आदी ठिकाणी पाठविल्याचे मूर्तीकार सांगतात.
कोविड काळात सरकारने मोठ्या मूर्ती बनविण्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे पाच फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती बनविता येत नव्हती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते निर्बंध हटविले. मात्र, त्याला उशीर झाला. कारण मोठी मूर्ती बनविण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, आता मोठी मूर्ती बनविणे शक्य नाही. आता अनेक मंडळे मोठी मूर्ती मागतात. मात्र, त्यांना मूर्ती देणे शक्य नसल्याचे मूर्तीकार सांगत आहेत.
आमच्या वडिलांपासून आम्ही गणेश मूर्ती बनविण्याचे काम करतो. आज आमची तिसरी पिढी गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. आमच्या कारखान्यात साधारण पाच हजार गणेश मूर्ती आहेत. कच्या मालाची वाढलेल्या किमतीच्या तुलनेत आम्ही गणेश मूर्तीची किमत कमी ठेवली आहे.
– नंदकिशोर रोकडे, रोकडे बंधू गणेश मूर्ती कारखाना
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने, भाविकांमध्ये मोठ्या उत्साह आहे. गणेश मूर्तींनाही मोठी मागणी आहे. आमच्या कारखान्यातील मूर्तींना मुंबई, पुणे येथून मागणी आहे.
– गणेश कांबळे, मूर्तीकार, नगर.