संगमनेर : नव्याने मंजूर झालेल्या हिवरे तवळी तलावाच्या मंजुरीचा निषेध करण्यासाठी जमलेले ग्रामस्थ. 
अहमदनगर

नगर : हिवरे तवळी धरणाचे काम होऊ देणार नाही; संदीप देशमुख यांचा इशारा

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : भोजापूर धरणाच्या वरील बाजूस हिवरे तवळी धरण होऊ घातले आहे. हे धरण झालेतर भोजापूर धरणाच्या पाण्याचा लाभ आम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आम्ही ते धरण होऊ देणार नाही अन् ज्यांनी त्या धरणाच्या मंजुर्‍या दिल्या त्यांना जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष आणि निमोन परिसराचे युवा नेते संदिप देशमुख यांनी दिला.

प्रवरा उपखोर्‍यातील भोजापूर धरणाच्या वरच्या वरील बाजूस हिवरे तवळी गावामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात (दि. दि. 9 मे) रोजी मंजूर झालेल्या 18.50 द.ल.घ.फूट ल. पा. बंधार्‍याच्या (धरणाचा) मंजुरीचा निषेध नोंदवण्यासाठी निमोणचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप देशमुख, निमोण यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा निमोण येथे आयोजित करण्यात आली होती.

देशमुख म्हणाले की, निमोण परिसरावर गेली 35 वर्षांपासून वैजापूर धरणाच्या पाण्याबाबत अन्याय झालेला आहे. हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही. भोजापूर धरणाची उंची वाढवून निमोण, पळसखेडे, पिंपळे कर्‍हे, सोनेवाडी, पारेगाव, नान्नज या गावांना मिळावं यासाठी प्रयत्न होने आवश्यक असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कांडेकर यांनी भोजापूरच्या चार्‍यांच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील घुगे यांनी भोजापूरच्या वरील बाजूस होणार्‍या धरणाच्या बाबतीत निषेध नोंदवला.

याप्रसंगी भीमराज चत्तर, हरिष चकोर राजेंद्र सोनवणे, विठ्ठल घोरपडे, गोरख घुगे, साहेबराव घुगे, विलास आव्हाड, सोमनाथ आरोटे, गोरख मंडलिक, संकेत घुगे, तुकाराम घुगे, ऋषी कांडेकर, सुनील मंडलिक, नीलेश गोर्डे, विकास आंधळे, प्रदीप कांडेकर, गणेश गाडेकर, रावसाहेब कांडेकर, सुधीर घुगे, सुरज मंडलिक, चांगदेव टोपडे, रामा घुगे, नवनाथ अत्रे, सोमेश कांडेकर, दीपक रेवगडे, बाळू जोंधळे, जालिंदर मंडलिक, जालिंदर कोटकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT