अहमदनगर

नगर : हजार पेन्शनधारक करणार दिल्लीत आंदोलन

अमृता चौगुले

शिरसगाव, पुढारी वृत्तसेवा : येत्या 8 ऑगस्ट रोजी इपीएस पेन्शनधारकांच्या प्रश्नी नवी दिल्लीत रामलीला मैदानावर राष्ट्रीय संघर्ष समितीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातून एक हजार पेन्शनधारक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

श्रीरामपुरात पार पडलेल्या बैठकीत पोखरकर बोलत होते.एक महिन्यात केंद्राने इपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये वाढ न केल्यास 1 ऑगस्टपासून इपीएफओच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयासमोर शेकडो पेन्शनर साखळी उपोषणास बसणार आहेत. दिल्लीमध्ये 2 लाख सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सत्याग्रह, रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक आंदोलने केल्यानंतर देशातून सर्व ठिकाणी पेन्शनधारकांनी पंतप्रधान मोदी यांचे याप्रश्नी लक्ष घालावे म्हणून खासदारांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT