अहमदनगर

नगर : सासरच्या जाचामुळे जावयाने घेतला गळफास

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : पत्नी वाईट वागत असल्यामुळे व तिच्या घरच्या मंडळींना कल्पना दिल्यावर सासरच्या लोकांकडून मिळत असणार्‍या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमेश बबन काकडे (वय 42, रा. ढोलेवाडी, संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली मिळालेली माहिती अशी की, ढोलेवाडी परिसरात सासुरवाडीला राहत असणार्‍या एका वाहनचालकास पत्नी वाईट वागत अस ल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने ही सर्व माहिती आपल्या सासर्‍याला दिली. आमच्या मुलीवर विनाकारण संशय घेतो, असे सांगून या वाहन चालकाला त्याच्या सासरकडील मंडळींनी वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्याने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मयत सोमेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कविता सोमेश काकडे, नाना बापु शेळके, लता नाना शेळके, संतोष नाना शेळके (सर्व रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT