अहमदनगर

नगर : सावकारी कर्जाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

अमृता चौगुले

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : येथील माऊली वडापावचे मालक शिवराम रमेश वहाडणे (वय 42) यांनी सावकारी कर्जाला कंटाळून मंगळवारी (दि.9) सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवराम वहाडणे यांनी आश्रमशाळेत शिक्षण घेतले. व्यवसायात मोठी झेप घेण्यासाठी सावकारी व बँकांचे मोठे कर्ज काढले; मात्र बँकांचे व सावकारांचे पैसे वेळेवर जात नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त झाले होते. पैसे मिळवण्यासाठी खासगी सावकारांनी वहाडणे यांच्याकडे तगादा लावला होता.

या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT