अहमदनगर

नगर : सहायक अभियंत्यास पाथर्डीमध्ये मारहाण

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : घरगुती वीजबिल जादा आल्याच्या कारणावरून महावितरणचे सहायक अभियंता मयूर जाधव यांना अकोला गावचे माजी सरपंच अनिल ढाकणे यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. दरम्यान, सहायक अभियंता जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महावितरणच्या कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवून पोलिस ठाण्यात धाव घेतली.

महावितरणच्या शहर कक्षाचे सहायक अभियंता मयूर जाधव कार्यालयात काम करत असताना तालुक्यातील अकोल्याचे अनिल ढाकणे यांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ढाकणे यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात जाधव दैनंदिन कामकाज करत असताना अनिल ढाकणे यांनी, 'माझ्या घराचे वीजबिल जादा आले आहे. त्यावर जाधव त्यांना तुमच्या मीटरचा घोटाळा असेल, तर कर्मचारी तेथे पाठवून मीटरमध्ये काही दोष नसेल, तर तुम्हाला जे काही बिल आले असेल, ते तुम्हाला भरावे लागेल, असे म्हणताच ढाकणे यांनी जाधव यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांनी तीव्र निषेध व्यक्त करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.

SCROLL FOR NEXT