अहमदनगर

नगर : सहा लाख घेऊन नवविवाहितेचा पोबारा

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील केडगावातील भूषणनगर भागात राहणार्‍या तरूणाला नवविवाहितेने सहा लाखांना चुना लावला असून, आपल्या आईसोबत नवविवाहिता पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात मध्यस्थासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश प्रभाकर भांबरकर (वय 24, रा. भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पत्नी आश्निवी महेश भांबरकर, सासू सुजाता राजू जाधव, सासरा राजू जाधव, मेव्हणा आकाश जाधव (सर्व रा. वडगाव आमली ता. पारनेर) व लग्नात मध्यस्थी करणारा राजेंद्र पोखरणा (रा. भाळवणी ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दि. 22 मे 22 रोजी फिर्यादी महेश यांचे आश्निवीसोबत लग्न झाले. दरम्यान, 16 जुलै रोजी आई सुजाताला केडगाव येथे घरी बोलावून घरातील दागिने, कपडे व रोख असा पाच लाख 82 हजार 979 रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

SCROLL FOR NEXT