अहमदनगर

नगर : संतप्त पेन्शनधारकांचे रक्ताचे अंगठे

अमृता चौगुले

शिरसगाव : इपीएस 95 पेन्शनधारकांनी दरमहा एक-दोन हजार अल्प पेन्शन मिळत असल्याने राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशभर विविध आंदोलने झाली, परंतु अद्याप निर्णय न झाल्यामुळे संतप्त पेन्शनधारकांनी पंतप्रधानांना निवेदन पाठविताना स्वतःच्या रक्ताने निवेदनावर अंगठे सह्या केल्या.

दरम्यान, मतदार संघातील खासदारांमार्फत हे निवेदन पंतप्रधान यांना पाठवायचे, असे ठरले. काल (रविवारी) श्रीरामपूर येथील काँग्रेस भवन येथे झालेल्या पेन्शनधारकांचे मेळाव्यात स्त्री- पुरुषांनी या निवेदनावर रक्ताचे सह्या/आंगठे दिले. हे निवेदन खा. सदाशिव लोखंडे व खा. डॉ. सुजय विखे यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली.

दरमहा 7500 रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा, त्यासाठी देशभर आंदोलन चालू आहे. त्याला आज पाठींबा दिला. ऑगस्ट क्रांतिदिनी दिल्लीतील आंदोलनासाठी नगर जिल्ह्यातून एक हजार पेन्शनधारक उपस्थित राहतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह दूरचे पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्राच्या धोरणाविषयी यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.

SCROLL FOR NEXT