अहमदनगर

नगर : संगमनेरात चोरट्यांनी दागिने लांबविले

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : शहरात चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी दोन दिवसांत पुन्हा एक दुचाकी व 70 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले आहेत. चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे व चोर्‍यांमुळे संगमनेर शहर पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

भानूप्रकाश बद्रिनारायण जोशी (वय 66, साई मंदिर शेजारी) यांची अ‍ॅक्टिवा (एम.एच. 17 सी.एफ. 0951) हि दुचाकी बुधवारी मध्यरात्री चोरट्याने त्यांच्या घरापासून चोरून नेली. सोपान नारायण फापाळे (वय 63, बेलापूर, अकोले) हे संगमनेर बस स्थानकात बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजाराची सोन्याची चेन लांबविली.

विजया श्रीनिवास अनमल ही महिला मालपाणी लॉन्स येथे भागवत कथेला गेली असता त्यांच्या गळ्यातील 25 हजाराचे मंगळसूत्र एका महिलेने चोरले. तर, यावेळी अन्य महिलांचेही दागिने चोरीला गेले होते. अनमल यांच्या फिर्यादीवरून कौशल्या सर्जेराव गायकवाड (ता. शिरूर, जी. बीड) या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT