अहमदनगर

नगर : संगमनेरमधील दुचाकीस्वारास लुटले

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : दुचाकी वाहन अडवीत शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल व रोख रकमेसह सुमारे सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना संगमनेर ते लोणी रस्त्यावरील समनापूर चौफुलीवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तिघा जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रस्त्यावरील निंबाळे चौफुलीवर धनंजय बाबासाहेब वर्पे हा तरुण आपला चुलत-चुलता किरण वर्पे यांच्यासह संगमनेरात आले होते. शहरातील कामकाज आटोपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते दोघेही धनंजय वर्पे यांच्या दुचाकीवरुन आपल्या घराकडे रहिमपूर येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची दुचाकी जोर्वे नाक्यावरून निंबाळ्याकडे जात असताना समनापूरकडून येणार्‍या बायपास रस्त्यावरील चौफुलीवर अचानक तिघेजण त्यांना आडवे झाले.

तिघाही चोरट्यांनी दुचाकीवरील दोघांना चाकूचा धाक दाखवून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुचाकीवरील काका-पुतणे घाबरले. त्यांनी तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण मारू नका? अशी विनवणी त्या चोरट्यांना केली. त्यानंतर त्यातील एकाने धनंजय वर्पे यांच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड आणि त्याचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व त्याच्या सोबत असलेल्या किरण वर्पे यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पोबारा केला. याबाबत धनंजय वर्पे यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आली. अज्ञात तिघांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT