शेवगाव : शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कॉ. संजय नांगरे यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. (छाया : बाळासाहेब खेडकर) 
अहमदनगर

नगर : शेवगावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

अमृता चौगुले

शेवगाव शहर, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहरातील जवळपास सर्वच भागात आणि बहुतेक महामार्गांवर बेकायदेशीर अतिक्रमणे, भर रस्त्यात भरणारा आठवडे बाजार, उकिरड्यांमुळे पसरलेले घाणीचे साम्राज्य, भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे यांचा त्रास शहरवासीयांना सातत्याने सहन करावा लागत आहे. त्यांच्या निषेधार्थ रविवारी (दि.24) कॉ. संजय नांगरे यांनी शेवगाव-नेवासा रोडवर मोकाट जनावरांच्या कळपात बसून ठिय्या आंदोलन केले.

या मोकट जनावरांचा बंदोबस्त तात्काळ न केल्यास नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेवगाव शहरांमधून जाणार्‍या चार प्रमुख महामार्गांवर दररोज प्रचंड वाहतूक असते. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. त्यातच रस्त्यांच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसलेले असतात. यावरून अनेकदा वाहन चालकांमध्ये वाद होतात.

पायी चालणार्‍या नागरिकांनाही या जनावरांपासून लांब होत रस्ता शोधावा लागतो. यामुळे अनेकदा अपघात होतात.
शहरात वाहतूक नियंत्रण शाखा अस्तित्वात नसल्यासारखी आहे. अवैध वाहतूक करणार्‍यांकडून सर्वसामान्य नागरिक, तसेच लहान मोठे वाहनचालक यांना अनेकदा त्रास दिला जातो. परंतु, या प्रश्नांची प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासन या आंदोलनाकडे कसे पाहणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT