अहमदनगर

नगर : शेतकऱ्याच्या बागेतील डाळिंबाची झाडे तोडली

अमृता चौगुले

करंजी, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मोहजबुद्रुक येथील शेतकर्‍याच्या डाळिंबाच्या बागेतील फळांची चोरी करून झाडेही तोडल्याची घटना घडली. याप्रकरणी विजय तुकाराम मचे या शेतकर्‍याने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोज बुद्रुक शिवारात मचे यांची दोन एकर शेती असून, त्यापैकी एक एकरात डाळिंबाची झाडे लावलेली आहेत. रात्रीच्यावेळी शेतातील डाळिंबाची किमान तीस ते पस्तीस झाडे शेतात घुसून तोडून बागेचे नुकसान करण्यात आले आहे. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे बाबासाहेब विश्वनाथ मचे, नवनाथ विश्वनाथ मचे व सोमनाथ बाबासाहेब मचे (सर्व रा. मोहोजबुद्रुक, ता. पाथर्डी) यांनीच डाळिंच्या बागेत अनाधिकाराने जाऊन फळझाडांचे नुकसान केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघा संशयित आरोपींविरोधात पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT