अहमदनगर

नगर : शेतकर्‍यांनी फुलांचा बाजार पाडला बंद

अमृता चौगुले

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा :नगर येथील फुले व्यापार्‍यांनी फुले विकत घेताना वजन व मापात फेरफार केले. फुलांना कवडीमोल बाजारभाव दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांनी विशेषता कोळगाव येथील शेतकर्‍यांनी नगर येथील फुलांचा बाजार बंद पाडला. शेतकर्‍यांनी फुले ओतून देत नाराजी व्यक्त केली.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली असून, दररोज फुल विक्रीसाठी शेतकरी नगर येथे मार्केट यार्डमध्ये फुलांच्या बाजारात तेथील व्यापार्‍यांकडे फुले विकत असतात; परंतु तेथील व्यापारी वजनात व मापात फेरफार करतात. फुलांना अतिशय कमी बाजार भाव देतात, असा आरोप फुले विक्रेत्यांनी व शेतकर्‍यांनी केला. येथील व्यापार्‍यांचा शेतकर्‍यांनी निषेध केला. यामध्ये कन्हेरवळ येथील सुनील लगड, अनिल लगड, दीपक लगड, नाना नलगे, सुरेश नलगे, शरद लगड, मनोज लगड आदी शेतकर्‍यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT