कोल्हार, पुढारी वृत्तसेवा : शिर्डीत येथे राहणार्या एका चौदा वर्षीय बालिकेस लग्नाचे आमिष दाखवत एका नराधमाने सातत्याने लैंगिक अत्याचार केले. त्याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी शहाबाज रियाज सय्यद (रा. श्रीरामनगर, शिर्डी) हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पीडितेस सातत्याने त्याच्या घरी बोलावत असे. त्या बालिकेस मी तुझ्याशी विवाह करेन. प्रत्येक वेळी असेच आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून ती गरोदरही राहिली. अशी तक्रार शिर्डी पोलिस ठाण्यात दिली.
या पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढलेले आहे. त्यामुळे याबाबत शाळांमधून जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.