अहमदनगर

नगर : शिक्षक बँकेसाठी अनेकांचं ‘गुडघ्याला बाशिंग’, उमेदवारी अर्जांचा पाऊस

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुमाउली, रोहोकले प्रणित गुरुमाउली, गुरुकुल, सदिच्छा, ऐक्य, शिक्षक संघ, शिक्षक भारती, स्वराज्य, इब्टा अशा विविध संघटनांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले आहेत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आज गुरुवार  हा एकच दिवस बाकी आहे. काल दिवसभरात 242 नवीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत दाखल अर्जाची एकूण संख्या 708 इतकी झाली आहे.

नॉन टिचिंग : 23
अनुसूचित जाती जमाती : 52
महिला राखीव : 77
इतर मागास : 77
वि.जा.भ. : 63

शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 17 जूनपासून अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे. शिक्षक बँकेसाठी सोमवारी 125 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी 341 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. आणि काल बुधवारी 242 नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 708 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे. आणखी आजचा एक दिवस बाकी आहेत. त्यामध्ये आणखी इच्छूक आपले अर्ज भरणार आहेत.

त्यामुळे शिक्षक बँकेसाठी एक हजारापेक्षा अधिक इच्छुक होऊ शकतात, असे संकेत आहेत. या वाढत्या अर्जांमुळे ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरांची संख्याही वाढणार आहे. दरम्यान, गुरुमाऊलीचे नेतृत्व बापूसाहेब तांबे, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाउलीचे रावसाहेब रोकोहले, गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर, ऐक्यचे राजेंद्र निमसे, सदिच्छाचे राजेंद्र शिंदे, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, स्वराज्यचे सचिन नाबगे नेतृत्व करत आहेत. या नेत्यांसमोर स्वबळावर लढण्याची भीती असल्याने नेमके कुणासोबत जावे, यासाठी ते चाचपणी करताना दिसत आहेत. अर्ज माघारीनंतरच हे चित्र स्पष्ट होईल. 24 जुलैला मतदान होईल.

गुरुमाउलीनंतर 'संघा'तील दुफळीचीही चर्चा गेल्या निवडणुकीत रावसाहेब रोहोकले गुरुजी आणि बापूसाहेब तांबे यांनी 'गुरुमाउली'च्या बॅनरखाली निवडणूक जिंकली होती. त्यानंतर या दोघांमध्ये तात्विक मतभेद झाले. त्यातून 'गुरुमाउली' नेमकी कुणाची, यावरून कागदोपत्री लढाई झाली. त्यात तांबे जिंकले, तर रोहोकले गुरुजींनी स्वतंत्र 'गुरुमाउली'ची स्थापना करून त्यांच्याविरोधात लढा उभा केला आहे.

आता गुरुमाउली चर्चेत असतानाच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघही चर्चेत आला आहे. संभाजी थोरात यांच्या नेतृत्वात यापूर्वीच ' त्या' नेत्याला काढून टाकलेले आहे. पनवेल या ठिकाणी जे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनाच्या पावत्या संघाकडे आल्या होत्या, 'त्यांच्या'कडे आलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना संघात स्थान नाही. आम्ही संघाची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून संघाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे कैलास चिंधे म्हणाले आहेत. त्यामुळे शिक्षक संघातील दुफळीही चर्चेत आहे.

सर्वसाधारण एकूण

संगमनेर : 39
नगर : 22
पारनेर :36
कोपरगाव : 25
राहाता : 26
श्रीरामपूर : 33
जामखेड : 33
पाथर्डी : 40
राहुरी : 23
शेवगाव : 24
श्रीगोंदा : 34
अकोले : 20
नेवासा : 32
कर्जत : 29

SCROLL FOR NEXT