अहमदनगर

नगर : शहरात तीन दिवस ‘निर्जळी’, शनिवारी शटडाऊन

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महावितरण कंपनीकडून शनिवारी (दि.20) सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत दुरूस्तीच्या कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाणीउपसा बंद राहणार असल्याने पाण्याच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत होणार आहे. पाण्याचे रोटेशन एक दिवस लांबणार आहे. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागास रविवारी पाणीपुरवठा होईल.

रविवारी (दि. 21) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॅालनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, टीव्ही सेंटर हडको, लॉईड बिशप कॉलनी परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. या भागास सोमवारी (दि.22) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सोमवारी (दि.22) पाणीपुरवठा होणार्‍या सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, आनंदी बाजार, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी आदी भागात मंगळवारी (दि.23) पाणीपुरवठा होईल. पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT