अहमदनगर

नगर : वृद्ध पित्याची मुलांविरुद्ध पोलिसांत धाव

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना शिवीगाळ, मारहाण करून घराबाहेबर काढणार्‍या दोन पोटच्या मुलांविराधोत 72 वर्षीय वृद्ध पित्याने पोलिसांत धाव घेतली आहे. केडगाव उपनगरातील हा प्रकार असून, कोतवाली पोलिसांनी माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियमानुसार मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

केडगावच्या शाहूनगरात राहणार्‍या एका 72 वर्षीय वृद्धाने आपले दोन्ही मुले आणि सुना आपल्याला शिवीगाळ व मारहाण करत असून, त्रास देत असल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी दिली. दोन्ही मुलांचे लग्न झाले असून, फिर्यादी यांना सांभाळण्याची त्यांची जबाबदारी असताना, शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलांनी घरून हाकलून दिल्यानंतर फिर्यादी यांनी न्याय मागण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्याठिकाणी त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन दाद मागण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बी. एम. इखे करत आहेत.

SCROLL FOR NEXT