अहमदनगर

नगर : विद्यापीठाकडून मतदार नावनोंदणीस मुदतवाढ

अमृता चौगुले

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या वर्षात होणार्‍या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या नोंदणीत अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी विद्यापीठाने नावनोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार आता पदवीधरांना 14 जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना 13 जुलैपर्यंत, तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी 10 जुलैपर्यंत मतदरनोंदणी करता येणार आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा व्यक्तींनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. यासाठी यापुढे पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पन्नास हजारांहून अधिक नोंदणी

या निवडणूक प्रक्रियेसाठी दरवर्षी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार आतापर्यंत 20 हजार 437 जणांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर, 30 हजार 254 जणांनी पुन्हा नोंदणी केली आहे. आजमितीला जवळपास 51 हजार जणांची यासाठी नोंदणी झाली आहे.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी ध्येेयधोरण ठरविण्यात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची भूमिका मोठी आहे. यामुळे या निवडणुकीसाठी पदवीधर, शिक्षक, विभागप्रमुख आणि संस्थाचालक यांंच्या सहभागातून या लोकशाही प्रक्रिया बळकट होईल.

                                                           – डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT