अहमदनगर

नगर : राहुरीत गतिमंद मुलीवर तरुणाकडून अत्याचार

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : एक विस वर्षीय गतिमंद मुलगी घरात एकटी असल्याची संधी पाहून आरोपीने जबरदस्ती तिच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. ही घटना रविवार दिनांक 26 जून रोजी राहुरी तालुक्यातील शनि-शिंगणापूर रस्त्यावर असलेल्या एका गावात घडली.

राहुरी ते शनि-शिंगणापूर रस्त्याला राहुरी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावात वीस वर्षीय मतिमंद मुलगी तिच्या आई वडिलांसोबत राहते. दिनांक 26 जून रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान ती घरात एकटीच होती. तेव्हा तिच्या वडिलांच्या ओळखीचा नानासाहेब सुखदेव बर्डे (वय 20, रा. बारागाव नांदूर रोड, राहुरी) हा मासे विकणारा आरोपी तेथे गेला. त्याने त्या मुलीला विचारले तुझी मम्मी घरी आहे का? मुलीने नाही म्हणताच आरोपी बर्डे याने घरात घुसून दरवाजा बंद करून घेतला. त्या मुलीची इच्छा नसताना आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

आई-वडील घरी आल्यावर मुलीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब सुखदेव बर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT