अहमदनगर

नगर : राहुरीत अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहत्या घरासमोरून अपहरण करण्यात आले. तिला पारनेर तालुक्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. ही घटना 27 जून रोजी घडली. पोलिसात 8 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 27 जून रोजी संध्याकाळी जेवण करून तिच्या आईसोबत घरासमोर असलेल्या पटांगणामध्ये झोपली होती. मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान आरोपी टिक्कल बर्डे हा त्या अल्पवयीन मुलीजवळ गेला. त्याने तिला झोपेतून उठवून तिचे तोंड दाबून उचलून लांब नेले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 'तू जर आरडाओरडा केला, तर बघ,' अशी दमदाटी करून तिला दुचाकीवर बसवून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात नेले. तेथे एका पडक्या खोलीमध्ये दमदाटी करून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. 'तू जर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला. हे दुष्कृत्य उघड होताच संतापाची लाट उसळली.

यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. मुलीच्या फिर्यादीवरून टिक्कल रोहिदास बर्डे (रा. बारागाव नांदूर) याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT