अहमदनगर

नगर : मोटरसायकल चोरायची अन् पार्ट काढून विकायचे : एकाला अटक

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा: नगर शहर परिसरातून मोटारसायकल चोरायची अन् त्या तशाच न विकता त्यांचे पार्ट काढून विकायचे. अशा चोरट्याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केल्या आहेत. अनिल बापू भोगे (वय 31, रा.वडगाव गुप्ता, ता.नगर), असे पकडलेल्याचे नाव आहे.

नगर शहर परिसरातून गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात याबाबतचे गुन्हे दाखल होत आहेत. असाच एक गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. केडगाव जवळील नेप्ती कांदा मार्केट परिसरातून राहुल भाऊसाहेब बोरकर यांची मोटरसायकल चोरीला गेली होती.

या गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलिस करत होते. बुधवारी (दि. 8) नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली. हा मोटारसायकल चोर वडगाव गुप्ता येथे आला असून, त्याच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे. या माहितीवरून पोलिसांनी वडगाव गुप्ता येथील अनिल बापू भोगे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची त्याने कबुली दिली.

त्याने सांगितले की, त्यांचे स्पेयर पार्ट काढून विकायचे. पोलिस पथकाने त्याच्याकडून सुटे पार्ट करून ठेवलेली मोटरसायकल (एम.एच.16 बी.ए. 6982) जप्त करण्यात आली. संशयित आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सानप यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस कर्मचारी थोरात, राहुल शिंदे, जयश्री फुंदे, साठे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT