अहमदनगर

नगर : मुळात 19 हजार क्यूसेकची आवक

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरण पाणलोटात गुरूवारी पाण्याची विक्रमी आवक झाल्याने साठा 12 हजार 373 दशलक्ष घनफुटावर पोहचला. पाणलोटात तब्बल 19 हजार 732 क्यूसेक नविन पाणी जमा होत आहे. दरम्यान, 26 हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण आज (शुक्रवारी) निम्मे भरणार असल्याचा असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे.

आषाढी सरींच्या वर्षावाने गुरूवारी सकाळी 11 हजार 152 क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक होत होती. आवक वाढत जावून दुपारी 3 वाजता 22 हजार 473 क्यूसेकवर पोहचली. कोतुळ सरिता मापन केंद्रामार्फत मुळा पाटबंधारे विभागाकडून नविन आवकेची मोजणी सुरू आहे.

अभियंत्यांकडून पहाणी

दरम्यान, अचानकपणे पाण्याच्या आवकेत वाढ झाल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखाभियंता शरद कांबळेंसह पाटबंधारे कर्मचार्‍यांनी तत्काळ दक्षता घेत धरणाच्या दरवाजांची पाहणी केली. 15 जुलैपर्यंत धरणामध्ये 16 हजार 500 दलघफू पाणी जमा असल्यास दरवाजे उघडावे लागेल. धरण अद्यापी 50 टक्के भरलेले नाही, परंतु धरणाकडे वाढलेली पाण्याची जोरदार आवक पाहता तत्काळ पाटबंधारे विभागाने दरवाजांची उघड बंदची चाचपणी केली.

11 दरवाजांची चाचपणी पूर्ण : शरद कांबळे

मुळा धरणाकडे कमी जास्त प्रमाणात नवीन पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. कार्यकारी अभियंता पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्व अकरा दरवाजांची उघडबंद चाचपणी पूर्ण झालेली आहे. पाटबंधारे विभाग आवक व पाणी साठ्याकडे बारकाईने लक्ष दते असल्याचे शाखाभियंता शरद कांबळे यांनी सांगितले.

मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी समाधानकारक आहे. धरणाचे दरवाज्यासह तटावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देऊन आहेत. मुळा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्याची परिस्थिती नाही, परंतु आगामी काळातील दक्षता घेत सर्व उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. – सायली पाटील, कार्यकारी अभियंता.

नदीपात्र वाहते आहे दुथडी भरून

मुळा धरणामध्ये गेल्यावर्षी आजच्या दिवशी 9 हजार 361 दलघफू होता. त्यातुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे. धरणामध्ये 12 हजार 373 दलघफू इतका पाणी साठा जमा झाला आहे. मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा करणारे मुळा नदी पात्र साडेचार मीटर दुधडी भरून वाहत असल्याची नोंद घेण्यात आलेली आहे.

SCROLL FOR NEXT