अहमदनगर

नगर : मुलीवर अत्याचार; पाच वर्षे सक्तमजुरी

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आत्माराम बापूराव लगड (58, रा. आठवड, ता. जि. नगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अहमदनगर येथील एका विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना, दि. 2 डिसेंबर 2019 व दि. 4 डिसेंबर 2019 रोजी शाळेतील कर्मचार्‍याने तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोपीविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. मुंडे यांनी तपास करून आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी यांनी एकूण 7 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये पीडिता, तिची आई व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सी.डी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल के. एन. पारखे यांनी सहकार्य केले.

SCROLL FOR NEXT