अहमदनगर

नगर : मालुंजेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : 15 वर्षापुर्वी दुष्काळी समजल्या जाणार्‍या मालुंजे गावाला जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या विशेष सहकार्यातून पाणी पुरवठा मंजूर होवून तो कार्यान्वित झाली असून, महिलांसह गावाची पिण्याच्या पाण्याची वणवण संपल्याने समाधान व्यक्त होत असल्याचे मत सरपंच संदीप घुगे यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावातील 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मालुंजे गावाकरीता विकासात्मक घौडदौड सुरु आहे. भविष्यात विकासाच्या माध्यमातून गावाचा चेहरा-मोहराच बदलून टाकणार असल्याचे घुगे म्हणाले.

वाटर फिल्टरसह विविध क्रॉक्रेटी रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन संगमनेर पं. स. माजी सभापती अंकुशराव कांगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश सोसे, राजेंद्र आव्हाड, काशिनाथ सोसे, संपतराव खरात, आनंदराव खरात, विजय डोंगरे, विष्णु घुगे, शशिकांत नागरे, शिवाजी बर्डे, ग्रामसेविका अंत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT