अहमदनगर

नगर : महिलेची पन्नास हजारांची फसवणूक

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : वीज बिल थकल्याचे सांगत अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगून मुख्याध्यापक असलेल्या महिलेची 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत नम्रता करणजित ओहरी (53, रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ओहरी यांना वीजबिल थकले असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. त्यासाठी दोन अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सूचना फसवणूक करणार्‍यांनी केली. त्यांच्या सांगण्यानुसार फिर्यादी नम्रता ओहरी यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 49 हजार 999 रूपये ऑनलाईन काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारे दोन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT