निवेदन देताना पदाधिकारी 
अहमदनगर

नगर : महामार्गावर टोलवसुली बंद करा

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग 61 चे काम अपूर्ण असूनही, बडेवाडी नाक्यावर टोलवसुली करून नागरिकांची लूट केली जात आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांनी दिला आहे.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपअभियंत्यांना निवेदन दिलेे आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून बंद आहे. खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. फुंदेटाकळीपासून नांदेडपर्यंत बडेवाडी वगळता एकही टोल सुरू नाही. बडेवाडी टोल नाक्यावर काम अपूर्ण असतानाही दोन वर्षांपासून टोल वसुली करून लूट होत आहे. खड्ड्यांमुळे होणारा त्रास व टोलवसुलीमुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

बडेवाडी टोल नाक्यावरील वसुली त्वरित बंद करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दराडे यांच्यासह वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पप्पू पालवे, फुलचंद चेमटे, संतोष शिरसाट, रवी औटी, आदर्श काकडे, राहुल बटुळे, राजेंद्र सोनटक्के, सुनील भंडारी, सचिन मोरे यांनी दिला. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT