अहमदनगर

नगर : बुवासिंद बाबांची चादर मिरवणूक उत्साहात

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेले अहमद चिस्तीया ऊर्फ बुवासिंद बाबा यांचा उरूस कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने पार पडला. यानंतर राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून फुलांनी सजविलेल्या चादरीची मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी शेकडो हिंदू- मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळानंतर राहुरी शहरातील बुवासिंद बाबा यांचा उरूस कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने झाला. यावेळी हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी दर्ग्याचे दर्शन घेतले. नंतर तिसर्‍या दिवशी गोसिया मस्जिद मुलन माथा येथून चादरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. राहुरी शहरात बुवासिंद बाबा यांना मानणारे भाविक भक्त भरपूर प्रमाणात आहे. त्या भक्तांची एक श्रद्धा बुवासिंद बाबा यांच्या प्रति दिसून येते. त्यामुळेच अनेक भाविक भक्त बाबांच्या दर्शनासाठी तसेच आपल्या अडचणीसाठी बाबांच्या दर्ग्यावर नेहमी उपस्थित असलेले दिसून येतात.

बुवासिंद बाबा यांच्या चादरीच्या सोहळ्याप्रसंगी राहुरी शहरातील फैय्याज पठाण, भैय्यासाहेब शेळके, रवी आहेर, गणेश खैरे, सचिन तनपुरे, मिनाष पटेकर, सादिक पठाण, मुज्जू पठाण व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या मिरवणुकीची सुरुवात गोसिया मज्जिद मुलन माथा येथून स्टेशन रोड, शनि चौक, शिवाजी चौक, गणपती घाट मार्गे अहमद चिस्तीया उर्फ बुवासिंद बाबा दर्गाह या ठिकाणी येऊन भव्य मिरवणूक काढलेली चादरेची सांगता करण्यात आली. नंतर चादर बाबांच्या दर्ग्यावर अर्पण करण्यात आली. जमलेल्या सर्व भाविक भक्तांनी बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकून दर्शन घेतले.

या भव्य मिरवणुकीसाठी अल अहद यंग ग्रुप चे अध्यक्ष उबेद सय्यद, महेश वाघ, सचिन कदम, सोहेल पठाण, परवेज इनामदार, शुभम झावरे आदींनी मोलाचे योगदान लाभले. त्यांनी नियोजन बद्ध पद्धतीने बुवासिंद बाबा चादरीची मिरवणूक शांततेने पार पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT