अहमदनगर

नगर : पारनेर तहसीलसमोर सोमवारी जागरण आंदोलन

अमृता चौगुले

जवळा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात राजकीय नेत्यांचीच कामे होत नसतील, तर सर्वसामान्य लोकांचे काय? तहसील कार्यालयाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती बापू भापकर यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातील वडुले येथील शेतकरी व बाजार समितीचे माजी सभापती बापू भापकर यांचे वडील प्रभाकर बापूसाहेब भापकर यांनी पारनेर तहसील कार्यालयातील कुळ कायदा विभागात नवीन शर्तींचा शेरा कमी करण्यासाठी प्रकरण दाखल केले. परंतु हेलपाटे घालूनही काम मार्गी लागले नाही. या शाखेच्या मनमानी कारभाराला कंटाळून तहसीलसमोर सोमवारी जागरण गोंधळ व पेढेतुला कार्यक्रम आंदोलन करण्याचा इशारा भापकर यांनी दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दि 17 नोव्हेंंबर 2021 रोजी प्रभाकर भापकर यांनी जमीन नावावर होण्यासाठी सदरचे प्रकरण दाखल केले, परंतु तहसील कार्यालयाने त्यावर कोणत्याही प्रकारची दखल न घेता जाणीवपूर्वक धुळखात ते पडून ठेवले. त्यानंतर भापकर यांनी काही दिवसांनी काम होत नाही, हे लक्षात येताच याबाबत उपजिल्हाधिकारी नगर यांचेकडे तक्रार दाखल केल्याने दुसर्‍याच दिवशी तहसील कार्यालयाने तुमची जमीन शासन जमा का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली. त्यावर भापकर यांनी वकिलाच्या मदतीने आपली सर्व कागदपत्रे नियमानुसार जोडले असताना आपण ही जमीन शासन जमा करू शकत नाही, हे लक्षात आणून दिले. त्यावर तहसील कार्यालयाने त्यांना जमीन नावे करण्यासाठी सरकारी रकमेचे चलन भरण्याचे आदेशही दिले.

भापकर यांनी सांगितलेल्या रकमेचे चलनही 23 जून 2022 रोजी भरले. परंतु अद्याप तहसीलमधील कुळ कायदा विभाग यावर आदेश काढत नाही. त्यांना जाग आणण्यासाठी कंटाळून भापकर यांनी 18 जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT