अहमदनगर

नगर : धबधब्याच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

अमृता चौगुले

बोटा, पुढारी वृत्तसेवा : सख्ख्या व चुलत भावांसोबत पिकनिकला गेलेल्या एका सतरा वर्षीय युवकाचा धबधब्याखाली पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सव्वातीन वाजता संगमनेर तालुक्यात घारगाव येथील कळमजाई माता देवस्थानलगत घडली. जहीर रफिक शेख (वय 17, रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर शेख कळमजाई माता देवस्थान परिसरात दोन भावांसोबत पर्यटनाला गेला होता. येथील धबधब्याखाली एक तळे आहे. जहीर भावांसोबत या तळ्यात पोहोण्यास उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बेशुद्ध झाला. काही पर्यटकांनी त्याला पाण्यातून वर काढले. रुग्णवाहिकेतून त्याला घारगाव येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी घुलेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून, त्यास मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT