सोनई : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव शिवारात दि. 11 रोजी पहाटे एक वाजता सहा लाख रुपये किमतीचा 13 टन लोखंडी गज वाहून नेणारा ट्रक आडवळणी रस्त्यावर घेऊन जाऊन चार चोरट्यांनी लुटला. जालन्याहून पुण्याकडे जात असलेला ट्रक (एम एच 12 घझ 3295) दि. 11 रोजी पहाटे एक वाजता औरंगाबाद ते नगर महामार्गावरील घोडेगाव शिवारातील चर्चजवळ आला.
तेव्हा दोन दुचाक्यांवरून आलेल्या चार चोरट्यांनी ट्रक अडवला. दोन चोरट्यांनी ट्रकमध्ये प्रवेश करून चालकास चाकूचा धाक दाखवून ट्रकमधील 5 लाख 61 हजारांच्या 10 हजार 450 किलो लोखंडी सळया, 7 हजारांचा मोबाईल असा एकूण 5 लाख 68 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद निसार गुलाब शेख (वय 34, धंदा ट्रान्सपोर्ट, अशरफनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.