अहमदनगर

नगर : ढोकीच्या घोड्याने शर्यतीमध्ये मारली बाजी

अमृता चौगुले

टाकळी ढोकेश्वर, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, गाजदीपूर येथील श्री बजरंग बली यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित घोड्यांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांक ढोकीचे बन्शी मोरे यांचा घोडा, दुसरा क्रमांक गाजदीपूरचे बाबाजी लकडे यांचा घोडा, तर तिसरा क्रमांक ढवळपुरीचे प्रकाश कोळपे यांच्या घोड्याने पटकावला.

घोड्यांच्या या शर्यतीचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अंकुश ढेकळे, उद्योजक बाळासाहेब रोकडे, चेअरमन दादाभाऊ रोकडे, व्हा.चेअरमन चंद्रकांत झिटे, सुभाष करगळ, दादाभाऊ नर्‍हे आदी उपस्थित होते.

यावेळी काशिनाथ दाते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या घोड्यांच्या शर्यतीचे उद्घाटन करण्यासाठी आलो होतो. मध्यंतरी कोरोना काळात यात्रेचा कार्यक्रम बंद झाला होता. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच या शर्यतीचे स्पर्धेचे उद्घाटन होत असल्याचा विशेष आनंद आहे.

यावेळी अंकुश ढेकळे, बाबाजी लकडे, महादू करगळ, दत्तोबा तिखोळे, लिंबाजी तिखोळे, धुळा कोळपे, सीताराम तिखोळे, हिरामण तिखोळे, बाबुराव तिखोळे, धोंडीबा लकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी शर्यतींचा आनंद लुटला.

SCROLL FOR NEXT