नगर : जिल्ह्यात शुक्रवारी 13 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरातील 5 जणांचा समावेश आहे. याशिवाय पाथर्डी तालुक्यात 2, श्रीरामपूर तालुक्यात 2, भिंगार 1, जामखेड 1, कोपरगाव 1 व राहाता तालुक्यात 1 जण बाधित आढळला.
गेल्या 24 तासांत अकोले, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, शेवगाव व पारनेर या आठ तालुक्यांत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 3 लाख 95 हजार 73 इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 87 हजार 761 इतकी असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 225 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.