अहमदनगर

नगर : जामखेडमध्ये भिडणार महाराष्ट्रातील नामांकित मल्ल

अमृता चौगुले

जामखेड, पुढारी वृतसेवा : नागेश्वराच्या पावन भूमीत कै. विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले असून, यामध्ये महाराष्ट्रातील नागांकित मल्ल भिडणार आहेत. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्या अंमित लढत होणार आहे.

या कुस्त्या मराठी शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानात बुधवारी (दि.3) दुपारी 2 ते 7 या वेळेत होणार आहेत. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै. विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अजय काशीद यांनी केले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रा. राम शिंदे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रोहित पवार, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, इंदौरचे भाजपचे नेते अशोक खंडेलवाल, हिंद केसरी रोहित पटेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे आदी उपस्थित राहणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद आणि मराठा भाषिक महासंघाचे अध्यक्ष युवराज काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मैदानाची संयोजन टीम काम करत असून, निकाली कुस्त्यांच्या मैदानासाठी सर्व पहिलवानांनी व कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

शालेय खेळाडूंचा स्पोर्ट टी शर्ट देवून सन्मान

कुस्ती मैदानावेळी अजय काशीद मित्र मंडळातर्फे तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान, तसेच शालेय खेळाडूंचा स्पोर्ट टी शर्ट देवून सन्मान आयोजिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT