अहमदनगर

नगर : चिखलठाण येथे दोघांना बेदम मारहाण, शिवीगाळ

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी समजावून सांगत असलेल्या दोघा भावांना गज, दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे घडली.

गणेश रभाजी काळनर (वय 24, रा. चिखलठाण, ता. राहुरी) याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 17 जुलै रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी हे हिराबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत होते. तेव्हा गणेश काळनर व सुरेश काळनर हे दोघे भाऊ त्यांना समजावून सांगत होते. तेव्हा आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज-लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. तुम्ही जर नीट राहिला नाही, तर तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली.

गणेश काळनर यांच्या फिर्यादीवरून रभाजी मारूती काळनर, खंडू मारूती काळनर, सविता राजू बाचकर, अविनाश राजू बाचकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT