अहमदनगर

नगर: गोदेला पूर 70000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

अमृता चौगुले

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: दारणा, गंगापूर, नाशिक त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर आला आहे. नांदुर मध्यमेश्वरमधून गोदापात्रात 70 हजार क्युसेक पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा प्रथमच वाहती झालेल्या गोदावरी पाण्याचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. संततधार पावसाच्या सरी अधून-मधून जोर धरत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसाने कोपरगावच्या आठवडे बाजाराचाही फज्जा उडाला. गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीकिनारी कोपरगावकरांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

अनेकांनी पहिल्याच पाण्यासोबत सेल्फीही काढले. दारणातून 15 हजार तर गंगापूर धरणातून 23 हजार, कांदवा 6712 क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. रविवारी रात्रीपासून कोपरगांव तालुक्यात भीज पाऊस सुरू आहे. सोमवारी संततधार सुरू होती. धामोरी, रवंदे, ब्राम्हणगांव, टाकळी, कोळपेवाडी, माहेगांव देशमुख, संवत्सर, दहेगाव, पोहेगांव परिसरात रिमझिम कोसळणार पास अधून-मधून जोर धरत होता. संततधार पावसाने शेतपिकांना दिलासा मिळाला आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

  • गोदावरी पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकिनारी जाऊ देऊ नये, कोणताही धोका वाटल्यास संजीवनी आपत्ती व्यवस्थापनाला कळवा, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.
  • नांदूर मधमेश्वर बंधार्‍यावर दहा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर
  • गोदावरी नदीने साडेपाच मीटरची वॉर्निंग लेव्हल ओलांडली
  • प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
  • नदीपात्रातील पाण्याची पातळी पाच मिटरवर-केंद्रीय जल आयोगाचे संजय पाटील यांची माहिती.
SCROLL FOR NEXT