अहमदनगर

नगर : गुलमोहर रोडवरील हुक्का पार्लरवर छापा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील गुलमोहर रोडवर पारिजात चौकात कोहिनूर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पाच हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे.
शारूख छोटुभाई शेख (रा. भैरवनाथ रेसीडेन्सी, नवनागापूर), सागर चंद्रकांत गायकवाड (रा. बालाजी चेंबर, भिस्तबाग चौक, सावेडी) अशी आरोपींची नावे आहेत.

गुलमोहर रोडवर कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना मिळाली. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता कोहिनूर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये हुक्क्यासाठी लागणारे काचेचे भांडे, रबरी पाईप, लाकडी कोळसा असा एकूण 5 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास दीपक जाधव करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT