नगर : पुढारी वृत्तसेवा : गावठी हातभट्ट्ीची दारू विकणार्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे सहा हजारांची गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. हातभट्ट्ीची दारू विक्री करणार्या पाच जणांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ रवींद्र भगवान गायकवाड (रा. काटवन खंडोबा), रेल्वे स्टेशन मालधक्का परिसरात संतोष मोहन जाधव (रा. भोसले आखाडा, नगर) यांच्यावर कारवाई करून दारू नष्ट करण्यात आली.
पोलिस कॉन्स्टेबल संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायनेटिक चौकात मिथून अंकुश पवार (रा. अचानकचाळ, रेल्वेस्टेशन), सुधीर डॅनियल क्षत्रिय (रा. केडगाव) याच्यावर कारवाई करत दारू नष्ट केली. पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्वस्तिक बसस्थानकाच्या गेटजवळ विनोद बबनराव शेटे (वंजारगल्ली, मंगलगेट) याच्यावर कारवाई करत दारू नष्ट केली.