अहमदनगर

नगर : गणवेश मिळणे संदिग्ध, पण पुस्तके नक्की..!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याच्या हालचाली दिसेना, मात्र मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. आहे. जिल्ह्यासाठी 23 लाख 94 हजार पुस्तके मिळाली असून, सर्व शाळांवर ही पुस्तके पोहोच करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, मनपा व अन्य अनुदानित शाळांचा समावेश असणार आहे. या शैक्षणिक वर्षासाठी 4 लाख 23 हजार 722 विद्यार्थ्यांसाठी 24 लाख पुस्तके बालभारतीकडून नगरला मिळालेली आहेत. सीईओ आशिष येरेकर यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी प्रत्येक शाळेवर संबंधित पुस्तके पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे. शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी कार्ले यांनी पाठपुरावा करून त्या-त्या शाळेत पुस्तके पोहोचवली आहेत.

नवगतांच्या स्वागताची तयारी!

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेला घरघर लागली आहे. पहिलीत गेलेली मुले, विना शाळेत जाता व परीक्षा न देताच तिसरीत गेली आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेच. यंदापासून मात्र शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत. 'पहिले पाऊल' हा उपक्रम राबवून नवगत मुलांचे स्वागत करण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. यामध्ये वृक्षारोपचाही समावेश आहे.

15 जूनला भरणार शाळा

शासनाने 13 जूपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता मुलांना 15 जूनपासून शाळेत बोलाविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 13 पासून शिक्षकांनी शाळेत हजर व्हायचे आहे, विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन झाल्यानंतर 15 पासून शाळा सुरू करण्यात येणार

तालुका            विद्यार्थी                 पुस्तके

  • नगर                30316                175484
  • संगमनेर           50284                250773
  • नेवासा              39349                231873
  • पाथर्डी              26255                49610
  • पारनेर              26446                130967
  • राहुरी               32953                188821
  • कर्जत               24172               136021
  • जामखेड           17379               101252
  • कोपरगाव          30849               173639
  • श्रीरामपूर           28311               166926
  • अकोले              30067               174565
  • श्रीगोंदा              31664               182429
  • शेवगाव              26984               161088
  • राहाता               28693               171892

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT