अहमदनगर

नगर : खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

अमृता चौगुले

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : खाकीत लपलेल्या प्रेमळ माणुसकीचे जेव्हा वेगळ्या रुपाने दर्शन घडते तेंव्हा ही 'खाकी वर्दी' आपल्या मनात आदराची गर्दी करून जाते. कर्जत पोलिसांबाबत, तर अनेकवेळा असे प्रसंग पहायला मिळाले. एका अनोळखी, बेवारस व्यक्तीला मिळवून दिलेल्या आधारामुळे नागरिकांच्या मनात खाकी वर्दी बद्दल आदराचे स्थान निर्माण झाले.

कर्जतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एक व्यक्तीला 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी दाखल केले. हा व्यक्ती अनोळखी व बेवारस असल्याने त्यास कोणीही नातेवाईक नव्हते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबत कर्जत पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली.

डॉ. महारुद्र खरपडे, डॉ. सचिन डफळ आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही परिस्थिती हाताळताना या व्यक्तीच्या खाण्या-राहण्याची व्यवस्था कशी होणार? नुसत्या वैद्यकीय उपचाराने प्रश्न सुटणार नाही, हा विचार केला. डॉक्टर आणि पोलिस वर्दीतला माणूसही प्रेम, जिव्हाळा, आपुलकीने भरलेला असतो, जणू हा संदेश देत त्यांनी त्याच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क साधला.

अनेकांना कॉल करून संवाद साधला; मात्र यश आले नाही. त्यानंतर नगरच्या मानव सेवा केंद्रास संपर्क साधून बेवारस व्यक्तीस पोलिस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शाहूराज तिकटे, ईश्वर माने, शकील बेग, सलिम शेख आदींनी दाखल केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT